यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- फैजपूर उपविभागातील यावल, फैजपूर व रावेर नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांवर अंकुश राहावा, यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर ‘ऑल आऊट कॉबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले.पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 ते 7 या वेळेत यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील यावल शहर, दहिगाव, साकळी, डांभुर्णी, किनगाव, अट्रावल, निमगाव आणि अंजाळे या ठिकाणी कॉबिंग ऑपरेशन करण्यात आले.
या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, उपविभागातील 5 पोलीस अधिकारी व 39 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. पथकाच्या 5 स्वतंत्र टीम्स तयार करून NBW/BW आरोपी, हदपार, दोनपेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सामील असलेले, शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे करणारे, हिस्ट्रीशीटर तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उपद्रव करणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली.या कॉबिंग ऑपरेशनदरम्यान पाहिजे असलेला १आरोपी मिळून आला. (सागर बाविस्कर), NBW बजावणी : 10, BW बजावणी : 6, समन्स बजावणी : 14, हिस्ट्रीशीटर तपासणी : 5, दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेले आरोपी : 21, दारूबंदीचे एकाधिक गुन्हे असलेले : 9, हदपार आरोपी तपासणी : 4 या सर्व आरोपींवर आवश्यकतेनुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आगामी निवडणूक प्रक्रिया निर्भीड, शांत व भयमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.

