Tuesday, March 17, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यायावल पूर्व वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा आरोप; चौकशीची मागणी.

यावल पूर्व वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा आरोप; चौकशीची मागणी.

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुक्यातील यावल पूर्व वनपरिक्षेत्राच्या हद्दीत अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही व्यक्तींमार्फत दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करून लाकडाची वाहतूक केली जात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.या प्रकारामुळे परिसरातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी संघर्ष संघटना उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच उपवनसंरक्षक (DCF) जळगाव यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून चौकशीची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने संबंधित भागात गस्त वाढवून कठोर उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या