Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावयोगासन स्पर्धेतील विजेच्या खेळाडूंचा गौरव

योगासन स्पर्धेतील विजेच्या खेळाडूंचा गौरव

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- जिल्हा योगासन स्पोर्टस असोशिएशन आयोजीत जिल्हास्तर योगासन स्पर्धत डॉ. पाटील योगा स्टुडिओ येथील खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश संपादन केले.

यामध्ये सुवर्णपदक विजेत्या मुलींमध्ये अन्वी कोटेचा, सिमरन तडवी, ऐश्वर्या खडके, हर्षाली विरकर, तर मुलांमध्ये ध्रुपद बोरसे, मानराज चौधरी, रजत पदक विजेत्या मुलींमध्ये हिरल बारी, विधी किनगे, ध्रुवी बडाले, मुलांमध्ये चैतन्य पवार, कास्य पदक विजेत्या मुलींमध्ये ईश्वरी सुरळकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना डॉ. अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूंचा युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील व प्रवीण पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या