नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे राष्ट्रीय सिकलसेल अनेमिया निर्मूलन अभियानाच्या निमित्ताने नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सब सेंटर नंबर एक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मान्यवर वैद्यकीय अधिकारी डॉ.इरेश पाटील, व डॉ.प्रमोद आमोदकर ( रुग्ण कल्याण समिती सदस्य) यांच्या हस्ते व्हाईट कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सेवक दीपक तायडे, ए एन एम श्रीमती.बी के साळुंखे, आशा वर्कर सौ.अरुणा योगेश पाटील, श्रीमती.कमलताई टापरे, श्रीमती. शोभा सूर्यवंशी हे कर्मचारी वृंद व तसेच रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे राष्ट्रीय सिकलसेल अनेमिया निर्मूलन अभियान कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES