जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-संत गाडगेबाबा बेघर निवासी केंद्र जळगाव येथे आज निवासींना प्रोजेक्ट चेअरमन इंदिरा जाधव यांच्याकडून इडली चटणी सांबार असा रुचकर नाश्ता देण्यात आला. सामाजिक जपणूक करणे,गरिबांना सहकार्य करण्याची भावना मनात तेवत ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जायंटस् ओजस्विनी सहेली ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा विभावरी पाटील, सचिव प्रियंका सूर्यवंशी, संचालक रेखा पाटील, संचालक अलका चौधरी तसेच बेघर संस्थेचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी ,प्रकल्प प्रमुख गणेश पाटील, नीता वानखेरकर (शिक्षिका) आशा पाटील केअरटेकर आणि शितल धनगर यांचेही सहकार्य लाभले. बेघर निवास संस्थेचे व्यवस्थापक श्री. कुलकर्णी तसेच आजच्या अन्नदाता जाधव आणि जायंटस् ग्रुपच्यावतीने आपले आभार मानण्यात आले.
बेघर निवासींना रुचकर नाश्ता वाटप कार्यक्रम
RELATED ARTICLES