Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद येथे आज उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन

नशिराबाद येथे आज उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांचे दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती (जि. पुणे) येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून, सर्वसामान्य जनतेसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नशिराबाद येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दि. १ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी ६ वाजता मंगलमूर्ती मंगल कार्यालय, मोठ्या बोगद्याजवळ, सुनसगाव फाटा, नशिराबाद येथे होणार आहे.

या श्रद्धांजली सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले असून, जिल्हा कार्याध्यक्ष (जळगाव लोकसभा) सैय्यद बरकत अली व शहर अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडणार आहे.तरी सर्व नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आठवण: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट नाव घेऊन माझी उमेदवारी जाहीर केली होती : गणेशभाऊ चव्हाण

नशिराबाद शहर अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट) चे नेते मा. अजित पवार यांच्यासोबतची एक महत्त्वाची आठवण सांगितली. दिनांक ३ मे रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) पक्षात माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांनी प्रवेश केला होता. या वेळी त्यांच्या सोबत नशिराबाद शहर अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण तसेच जळगाव लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष सैयद बरकत भाई अली यांनीही पक्षप्रवेश केला होता.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी नगरपालिका-नगरपरिषद निवडणुकीदरम्यान थेट माझे नाव घेऊन पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली होती, अशी आठवण गणेशभाऊ चव्हाण यांनी सांगितली. तसेच पक्षाच्या वतीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे आदेशही त्यांनी दिले होते, असेही त्यांनी नमूद केले.पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास व दिलेली जबाबदारी ही आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगत, त्या आठवणींना आजही विशेष महत्त्व असल्याची भावना गणेशभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या