Saturday, July 11, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहर वाहतूक शाखेची अल्पवयीन वाहन चालकांविरोधात विशेष धडक मोहीम; ४८ जणांवर...

जळगाव शहर वाहतूक शाखेची अल्पवयीन वाहन चालकांविरोधात विशेष धडक मोहीम; ४८ जणांवर कारवाई, पालकांना २.४० लाखांचा दंड

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-जळगाव शहरात अल्पवयीन मुलांकडून होणारे वाहनचालकत्व रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.या विशेष मोहिमेदरम्यान वाहन चालविताना ४८ अल्पवयीन वाहनचालक आढळून आले. संबंधित वाहनांच्या पालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.कारवाईनंतर संबंधित पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून समुपदेशन करण्यात आले. १८ वर्षांखालील मुलांना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालविण्यास देऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविल्यास त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याचीही जाणीव पालकांना करून देण्यात आली.शहर वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनमालक व पालकांवर यापुढेही मोटार वाहन अधिनियमांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त जळगाव घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या