Saturday, July 11, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यायावल तालुक्यात भेसळयुक्त दुधाच्या विक्रीचा संशय; कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नागरिकांची...

यावल तालुक्यात भेसळयुक्त दुधाच्या विक्रीचा संशय; कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नागरिकांची मागणी

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-राज्यात अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने धडक कारवाया सुरू असताना यावल तालुक्यात मात्र कथितरित्या भेसळयुक्त दूध व इतर खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळयुक्त दूध, पनीर, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच इतर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विविध जिल्ह्यांत तपासणी व कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे.मात्र, यावल तालुक्यात काही ठिकाणी आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.यावल तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवून दूध व इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, संबंधित प्रकरणाबाबत अधिकृत तपासणी अहवाल अथवा अन्न व औषध प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नसून, तपासणीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या