Wednesday, November 18, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादचे माजी उपसरपंच गणपत सदाशिव पाटील यांचे निधन

नशिराबादचे माजी उपसरपंच गणपत सदाशिव पाटील यांचे निधन

नशिराबाद : नशिराबाद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणपत सदाशिव पाटील (वय ७३) यांचे बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नशिराबाद परिसरात शोककळा पसरली आहे.गणपत सदाशिव पाटील यांनी नशिराबाद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता. सामाजिक व सार्वजनिक जीवनात त्यांचा परिचय होता. नशिराबादचे माजी सरपंच तथा नगरपरिषदेचे सार्वजनिक बांधकाम सभापती विकास पाटील, महेश पाटील, किरण पाटील व निलेश पाटील यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पाटील वाडा, नशिराबाद येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या