Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावमहाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...'हे' २२ जिल्हे प्रस्तावित; भुसावळ जिल्हा होणार..!

महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा…’हे’ २२ जिल्हे प्रस्तावित; भुसावळ जिल्हा होणार..!

भुसावळ जिल्हा होणार

मुंबई/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्यात आता नव्याने नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित नूतन जिल्हा निर्मितीची प्रतिक्षा आहे.आता नकाशाही बदलणार आहे.

भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. अनेक जिल्हे हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली.नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली. मात्र, त्यासाठी २० वर्षांचा कालखंड जावा लागला. वीस वर्षापूर्वी अनेक जिल्ह्याची निर्मिती झाली होती.त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन दहा जिल्ह्यांची भर पडून आपला महाराष्ट्र ३६ जिल्ह्यांचा झाला आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जिल्ह्यात शेवटच्या गावातून येणाऱ्या नागरिकाला अवघा दिवस खर्ची घालावा लागतो.विविध समस्यांना सामोरे जावे लागते तसेच वेळही वाया जात असतो. जिल्ह्याचे मुख्यालये याचे अंतर ६० ते ९० किलोमीटर पर्यन्त असते,त्यामुळे महत्वाची कामे रखडत असतात,असा प्रत्यय अनेकांना येत असतो. त्यामुळे नवीन २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. प्रस्तावित असलेल्या जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा लागून आहे.

पूर्वी खान्देश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि मुंबई हे १० जिल्हे होते. प्रारंभीचे २६ जिल्हे ठाणे, कुलाबा (आताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) हे २६ जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.

१९८१ पासून आतापर्यंत झाले हे १० जिल्हे .. या जिल्ह्यातून हा जिल्हा तयार रत्नागिरी – सिंधुदुर्ग (१ मे १९८१) छत्रपती संभाजीनगर – जालना (१ मे १९८१) धाराशिव – लातूर (१६ ऑगस्ट १९८२) चंद्रपूर – गडचिरोली (२६ ऑगस्ट १९८२) बृहन्मुंबई – मुंबई उपनगर (१ ऑक्टो. १९९०) अकोला – वाशिम (१ जुलै १९९८) धुळे – नंदुरबार (१ जुलै १९९८) परभणी हिंगोली (१ मे १९९९) भंडारा – गोंदिया (१ मे १९९९) ठाणे – पालघर (१ ऑगस्ट २०१४)

जळगाव मधून भुसावळ हा जिल्हा होणार

आता आणखी २२ जिल्हे प्रस्तावित आहेत. जे प्रस्तावित आहेत, त्या शहराची लोकसंख्या ही वाढली आहे.आता नाशिक-मालेगाव, कळवण, पालघर – जव्हार ठाणे – मीरा भाईंदर, कल्याण,  अहमदनगर – शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, पुणे – शिवनेरी, रायगड – महाड, सातारा – माणदेश, रत्नागिरी  – मानगड, बीड – अंबेजोगाई, लातूर – उदगीर, नांदेड – किनवट, जळगाव – भुसावळ, बुलडाणा – खामगाव, अमरावती – अचलपूर, यवतमाळ – पुसद, भंडारा – साकोली, चंद्रपूर -चिमूर गडचिरोली – अहेरी हे नवे जिल्हे होणार आहेत. राज्यात २२ नव्या जिल्ह्याची भर पडणार असून राज्यात एकूण ५८ जिल्हे असणार आहेत.लवकरच नव्या जिल्ह्याची घोषणा होईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या