धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या गो तस्करीचे प्रमाण वाढले आहे,आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर गो तस्करी करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. त्यात तीन गोऱ्हे ठार झाले तर चार जखमी झाले आहेत. अपघातप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुंडाणे फाट्यावर काल मध्यरात्री १.१५ वाजेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या पिकअप वाहनावरील (क्र. एम. एच. ४५ / ३५९३) चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रोड लगत असलेल्या खड्ड्यात जावून उलटले. या वाहनातून गुरे तस्करी होत होती. अपघातात वाहनातील तीन गोऱ्हे ठार झाले. तर चौघे जखमी झालेआहेत. धुळे पोलिसांनी १ लाख रुपये किंमतीच्या वाहनासह १३ हजार रुपये किंमतीची गुरे मिळून एक लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक राजेंद्र हिवरकर यांच्या फिर्यादीवरुन वाहन चालक सलमान शेख सलीम (रा. आंबेडकर चौक देवपुर, धुळे), शाहरुख बेग रसुल बेग (रा. आंबेडकर चौक, देवपूर, धुळे) आणि एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
गो तस्करी करणाऱ्या गाडीला अपघात, ३ गोऱ्हे ठार
RELATED ARTICLES

