Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईम" स्पा " सेंटर मध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

” स्पा ” सेंटर मध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पार्टटाइम कामाच्या शोधात “ स्पा” सेंटरमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करुन तिचे मोबाइलमध्ये फोटो काढण्यात आले. नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात ही घटना घडली आहे. फोटोच्या माध्ययमातून तिला ब्लॅकमेल करत तिला वेश्याव्यवसायात लोटून उपजीविका कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दांपत्याविरुद्ध यापूर्वी देखील असे दोन गुन्हे दाखल आहेत. परेश सुराणा, खुशबू सुराणा अशी या संशयितांची नावे आहेत. सरकारवाडा पोलिस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ती एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. तिच्या घरची परिस्थिती हलाखाची आहे. महाविद्यालयाच्या भिंतीवर लावलेल्या “ स्पा” सेंटरच्या जाहिरातीवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर तिने संपर्क साधला. त्यावेळी पलीकडून एका महिलेने तिला टिळकवाडी येथे बोलावून घेतले. साफसफाईचे काम असल्याचे तिला सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी कामावर गेली असता संशयित महिलेने तिला ज्युस पिण्यास दिले. यांनतर तिला गुंगी आली.शुद्धीवर आल्यानंतर अंगावर चादर असल्याचे तिला दिसले. शेजारी अर्धनग्न अवस्थेत एक व्यक्ती असल्याचे देखील तिला दिसले. तिने विचारणा केली असता संशयित महिलेने अनोळखी व्यक्तीसोबत मोबाइलमध्ये काढलेला व्हिडीओ दाखवत तिला ब्लॅकमेल करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या