अमळनेर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पती शेतात गेल्यानंतर २८ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील भिलाली येथे घडली. ती आजुबाजूला आणि माहेरी ही आढळून आली नाही. त्यामुळे मारवड पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सकाळी महिलेचा पती शेतात कामासाठी निघून गेला. दुपारी १२:३० वाजता तो घरी आला असता पत्नी दिसून न आल्याने त्याने घरी विचारले असता त्यांनाही माहित नसल्याने त्यांनी आजूबाजूला तपास केला असता शेजारी महिलेने सांगितले की, महिला पांझरा नदीकाठी दिसली होती आणि बेटावद येथे गादी भरायला जात असल्याचे सांगितले. त्यावरून बेटावद येथे तसेच आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता कोणतीच माहिती न मिळाल्याने महिलेच्या माहेरी तपास केला. मात्र तरीही शोध न लागल्याने मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत.

