Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedरावेर तालुक्यात तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

रावेर तालुक्यात तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

फैजपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात महिला आणि तरुणींवर अत्याचार होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे.लग्नाचे अमिष दाखवत सहा महिन्यांपासून झज्ञलेल्या अत्याचारातून महिला गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय आदिवासी तरूणी वास्तव्याला आहे. सहा महिन्यांपूर्वी तिची ओळख फैजपूर येथील राहणारा सर्फराज सईदखान (वय २४) याच्याशी झाली. त्यानंतर त्याने तरूणीशी ओळख निर्माण केली. तिला लग्नाचे आमिष दाखवत मुंबई, जळगाव आणि तिच्या राहत्या घरी वेळीवेळी अत्याचार केला. गेल्या सहा असलेल्या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संशयितांने गर्भपात करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पिडीत तरुणीने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सर्फराज सईदखान याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या