Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावगोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ डंपरच्या धडकेत बालिका ठार

गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ डंपरच्या धडकेत बालिका ठार

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहर परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. आईसोबत शाळेतून घरी जाणा-या चार वर्षाच्या बालिकेचा डंपरने दिलेल्या धडकेने अंत झाला. उपचारापूर्वीच बालिकेला मृत्यूने गाठले. महामार्गावर झालेल्या या अपघाताने घटनास्थळी आक्रोश बघण्यास मिळाला. अपघात स्थळी बघ्यांची गर्दी झालेली दिसून आली.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.प्रेरणा नेमाडे असे मयत बालिकेचे नाव आहे. प्रेरणा ही पब्लिक स्कुलमधे नर्सरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर तिला घेण्यासाठी तिची आई आली होती. स्कुटीने माय-लेकी घराच्या दिशेने माऊलीनगराकडे जात होत्या. दरम्यान हॉटेल तनयजवळ भरधाव वेगातील डंपरने स्कुटीला धडक दिली. या धडकेत प्रेरणा गंभीर जखमी झाली. अपघात होताच डंपर चालक घाबरून पळून गेला. जखमी प्रेरणा उपचारापूर्वीच मृत्युमुखी पडली होती.तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन महाजन यांनी मयत घोषित केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या