Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यास्व.विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे अल्पोपहार वाटप.

स्व.विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे अल्पोपहार वाटप.

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- फैजपूर येथील स्व. विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विपुल बोरोले प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ, फैजपूरचे सहसचिव प्रा. डॉ.विलास चुडामण बोरोले यांच्यावतीने स्व. विपुल बोरोले यांच्या स्मृतीनिमित्त शाळेतील बालवाडी व इयत्ता 1 ते 4 च्या सर्व विद्यार्थ्यांना हा अल्पोपहार पुरवण्यात आला होता. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस जे तळेले ,पर्यवेक्षक बी.एम.बोंडे, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या