नशिराबाद | प्रतिनिधी : गणेशोत्सवानिमित्त नशिराबाद येथील आठवडे बाजार मित्र मंडळ गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला.कार्यक्रमाच्या प्रारंभी नशिराबाद नगर परिषदेचे आरोग्य सभापती चेतन बऱ्हाटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायणाची विधिवत पूजा करण्यात आली. पूजनानंतर भंडाऱ्याला सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिक तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रकाश कंगरे, गणेश राजपूत, संदीप सोनवणे, दीपक सोनवणे, विशाल सोनवणे, नितीन कुंभार, नितीन भोई, निलेश धनगर, दर्शन झटके, योगेश सपके, शुभम प्रजापती, अरुण भोई, मयूर झटके व किरण कुंभार यांचा सहभाग होता.मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.