Tuesday, September 22, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणन्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नशिराबाद, ता. जळगाव : येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गणेशोत्सवानिमित्त इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची गोडी निर्माण होण्यासोबतच त्यांची शब्दसंपत्ती वाढावी व बौद्धिक कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी नशिराबाद नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील आणि संस्थेचे संचालक ॲड. प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अंतिम फेरीत समान गुण मिळाल्याने प्रथम व द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला.स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून कु. मृणाल चौधरी, कु. डिंपल रोटे, कु. चित्राक्षी चौधरी आणि कु. चैताली पाटील यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक विभागून कु. देवेंद्र भोई व कु. रुद्र चौधरी यांनी मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, संचालक ॲड. प्रदीप देशपांडे, मुख्याध्यापक प्रवीण महाजन तसेच शिक्षकवृंदाने अभिनंदन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना अशा शैक्षणिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे सांगण्यात आले. स्पर्धेचे नियोजन वंदना चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन नंदिनी सूर्यवंशी यांनी, तर परीक्षण पूजा पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या