जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-निसर्ग कवी बालकवी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त महाबळ रस्त्यावरील एस.पी. बंगल्यानजीकच्या काव्यरत्नावली चौकात साहित्य व कालाप्रेमींतर्फे बालकवींना आदरांजली वाहण्यात आली. यात विशाखा देशमुख, लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव,कवी व कलावंत तुषार वाघुळदे , संजय पाटील , सुनीता भंगाळे , दीपक पाटील , अनिल पाटील ,भुसावळ ,अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,समाज चिंतामणीचे अध्यक्ष आर.डी.कोळी, गोविंद पाटील,किशोर पंढरीनाथ पाटील ,अनिकेत नेमाडे , किशोरी राणे यासह अनेक साहित्यिक,कवी आणि रसिक- श्रोते उपस्थित होते.धरणगाव येथील बालकवींचे स्मारक लवकर पूर्ण करावे यासाठी राज्य सरकारकडे पाठ पुरावा करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी ” श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे “… तसेच ” आनंदी आनंद गडे.. इकडे तिकडे चोहीकडे “… या बालकवी ठोंबरे यांच्या गाजलेल्या प्रसिद्ध कविता सादर करण्यात आल्या. उपस्थितांनी कविवर्य बालकवींच्या स्मारकावर फुले अर्पण करून आदरांजली वाहिली आणि नमन केले. जळगाव शहरातील तसेच काही शिक्षण प्रेमी मंडळींनी सुद्धा त्रंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची जयंती साजरी केली.
निसर्गरत्न बालकवी यांच्या जयंतीचा काव्य रत्नावलीचौकात कार्यक्रम
RELATED ARTICLES

