Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावपूर्ववैमनस्यातून शेतकरी पती-पत्नीला जोरदार मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून शेतकरी पती-पत्नीला जोरदार मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  जिल्ह्यात गुन्हेगारी कमी होण्याचे चिन्ह दिसत नसून यात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या पत्नीसह बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, देविदास सरदार चव्हाण (वय-५४, रा. सुभाष वाडी) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा ज्ञानेश्वर देविदास चव्हाण हे त्यांचे मेनकाबाई रामचंद्र चव्हाण आणि सोनल चव्हाण सर्व रा. सुभाष वाडी यांनी देविदास चव्हाण आणि त्यांचे पत्नी गीताबाई चव्हाण यांना डोक्यात दगड मारून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी देविदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण, रंजीत चव्हाण मेनकाबाई चव्हाण, सोनल चव्हाण या चौघावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्निल पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या