जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षेच्या निमित्ताने मराठवाडा दौर्यात लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात (स्वायत्त) ” समाज माध्यमे आणि महात्मा गांधी ” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयातील प्रा. संभाजी पाटील यांनी अल्पावधीत कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन केले.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीसह अनेक राष्ट्रपुरुषांनी सहभाग घेतला व बलिदान दिले. कोणी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला तर महात्मा गांधी यांनी अहिंसा, सत्याग्रह, सविनय कायदेभंग यासारखे मार्ग अवलंबिले. अलिकडच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यमांचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. दुर्देवाने या माध्यमातुन येणाऱ्या घटना सत्यावर आधारित नसतात. त्यामुळे तरुणांनी सावध राहिला हवे. वास्तव जाणुन घेण्यासाठी पुस्तक वाचनावर भर दिला पाहिजे. सर्वच राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अभिमान बाळगला पाहिजे असे आवाहन केले.
माहिती तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यमांचा प्रभाव चांगलाच वाढला: प्रा.संभाजी पाटील
RELATED ARTICLES

