Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावशेठ ला.ना. विद्यालयात तालबद्धसुरात पसायदानाचे सामूहिक पठण संपन्न

शेठ ला.ना. विद्यालयात तालबद्धसुरात पसायदानाचे सामूहिक पठण संपन्न

जळगाव | प्रतिनिधी  | पोलिस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त त्यांचा विश्वकल्याणचा विचार शालेय जीवनापासून विद्यार्थांना समजावा या हेतूने शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेतील सकाळ आणि दुपार विभागात सामूहिक पसायदान पठणा चा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी पर्यवेक्षिका भारती गोडबोले या होत्या .अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे होते तसेच व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप , ज्येष्ठ पर्यवेक्षिक संजय वानखेडे तसेच पर्यवेक्षिका रमा तारे उपस्थित होत्या.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिम्मत काळे ,प्राजक्ता गोहिल यांनी केले, बापू पाटील व पद्मजा जोशी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. श्रीमती संपदा तुंबडे यानी संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग सादर केला, हिम्मत काळे यांनी चांगदेवाचे गर्वहरण ही कथा विद्यार्थ्यांना सांगितली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तथा शाळेच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका भारती गोडबोले यांनी पसायदानाची पार्श्वभूमी विदयार्थ्यांना सांगितली, पसायदान हे विश्वाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागितले, तसेंच समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, सर्वांमध्ये मैत्रीची भावना वाढीस लागावी, अशा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने पसायदानमधील ओळींचा अर्थ सांगितला. त्या नंतर शाळेतील शिक्षक जयश्री नेहते , स्वाती एडके , पर्यवेक्षिका सौ.रमा तारे मॅडम, ए.व्हि.चौधरी, पी.आर. सोनवणे, पद्मजा जोशी, प्राजक्ता गोहिल, रेवती किन्हीकर, यांनी एकासुरात , तालबद्धपणे, विद्यार्थ्यांकडून पसायदानाचे सामूहिक पठण करून घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा वंजारी ,स्मिता करे यांनी तर आभार प्रदर्शन स्वाती एडके आणि ए.व्हि.चौधरी यांनी केले.या प्रसंगी इयत्ता ७ वी/अ मधील विद्यार्थ्यांनी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपान, संत मुक्ताबाई यांची वेशभूषा करून सजीव आरास सादर केली. या कार्यक्रमास उमेश ढाकणे ,गौरव देशमुख ,पंकज महाले,नितीन कोष्टी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या