Sunday, September 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार २२ कोटींच्या विकास कामांचा...

नशिराबाद येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार २२ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ…

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे विकासाची नवी सकाळ उजाळणार असून, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी दि. १८ ऑगस्ट रोजी नवीन नगरपरिषद इमारत, होमगार्ड ऑफिससमोर, नशिराबाद येथे तब्बल १४ कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण होणार असून ७ कोटींच्या नवीन विकास कामांचे भूमिपूजनही होणार आहे.

१४ कोटींच्या कामांचे लोकार्पण:- या सोहळ्यात नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह पूर्णत्वास गेलेल्या १४ कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रोत्साहन आणि निधीमुळे उभारलेल्या नवीन इमारतीचे मोठ्या थाटामाटात त्यांच्याच हस्ते उद्घाटन होणार आहे.

७ कोटींच्या कामांचे भूमिपूजन:- याच कार्यक्रमात नगरपरिषदेच्या हद्दीत ७ कोटी रुपयांच्या नव्या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे.

५२ कामांचा धडाका:- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे नशिराबादमध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. आगामी सोहळ्यात वॉर्ड क्र. १ ते १० मधील तब्बल ५२ कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती:- या कार्यक्रमाला मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, प्रशासक शीतल राजपूत (मेहेर) यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गावकऱ्यांमध्ये उत्साह:- गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे या कार्यक्रमाची गावकऱ्यांना मोठी आतुरता लागली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या