Wednesday, July 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमचिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन पीडितेवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन पीडितेवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून कारवाई; पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्याकडे..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून पीडितेला चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुनील सावके (सुपरवायझर, गोदावरी हॉस्पिटल कॅम्पस) याच्याविरुद्ध कलम 64, 65 पोस्को अधिनियम कलम 4, 6, 8, 12 प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्याकडे संबंधित गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला असून कर्मचारी गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर भिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार आणि भूषण पाटील हे तपास कामी मदत करीत असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या