Monday, March 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावजागतिक महिला दिनानिमित्त २७ महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त २७ महिलांचा सन्मान

जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- जागतिक महिला दिनानिमित्त जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन/दिशा स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरून येथील राज विद्यालयात महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या २१ महिलांचा फुलगुच्छ, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील सहा परिचारिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला प्रा. रफिक शेख, माजी महापौर जयश्री महाजन, नगरसेविका जयश्री पाटील, डॉक्टर संदीप पाटील, निलेश बनसोडे, हेमंत दाभाडे, अर्चना माळी, भारती काळे, संदीप राणे, राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व सचिव हर्षाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन हेमंत बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या