Sunday, May 10, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआज गोंभी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सव ; बारा गाड्यांची परंपरा कायम

आज गोंभी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सव ; बारा गाड्यांची परंपरा कायम

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोंभी गावात सालाबादप्रमाणे यंदाही श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाचे आयोजन आज सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त पारंपरिक बारा गाड्यांचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून ग्रामस्थांमध्ये यात्रेबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे.

या धार्मिक सोहळ्यात भगत स्व. जगन्नाथ कोळी यांच्या आशीर्वादाने भगत विजय कोळी हे बारा गाड्या ओढणार असून त्यांना बगले म्हणून राजेंद्र कोळी व जितेंद्र कोळी हे सहकार्य करणार आहेत. गोंभी येथील ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र मानली जाते.यात्रेनिमित्त गावात मिठाई, खेळणी तसेच विविध वस्तूंची दुकाने उभारली जातात. त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित राहून आनंद लुटतात. गावातील सर्व नागरिक एकत्र येत यात्रेचा उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करतात, ही या यात्रेची विशेषता मानली जाते. वर्षातून एकदाच येणाऱ्या या यात्रेच्या दिवशी गावात उत्सवी वातावरण निर्माण होते.

यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी सुकलाल बोराडीकर यांच्या तमाशाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांनी व नागरिकांनी शांतता व शिस्त राखून यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस पाटील सौ. वैशाली प्रमोद पाटील व सरपंच सौ. काजल भोजराज कोळी यांनी केले आहे.दरम्यान यात्रेच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोस्टचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून यात्रेच्या ठिकाणी चोख पोलीस व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच तरुण मंडळ यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या