Friday, July 17, 2026
police dakshta logo
Homeअपघातजळगावजवळ भरधाव कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

जळगावजवळ भरधाव कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

जामनेरहून जळगावकडे येणारी कार डिव्हायडरवर आदळून पलटी; एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव : प्रतिनिधी
जामनेरहून जळगावकडे येणाऱ्या भरधाव कारचा गाडेगाव शिवार ते जळगाव विमानतळ दरम्यान भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चारही जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांच्या ओळखीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती समजताच जखमी व मृतांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.ही घटना जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या