Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावअजबच...! खुनाच्या गुन्ह्यातील कैदी सबजेलमधून पळून जात असताना कलेक्टर ऑफिसच्या गेटमध्येच शिताफीने...

अजबच…! खुनाच्या गुन्ह्यातील कैदी सबजेलमधून पळून जात असताना कलेक्टर ऑफिसच्या गेटमध्येच शिताफीने पकडले..!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-– जळगाव सबजेलमध्ये नेहमीच काही न काही घटना या घडतच असतात, आता ही बाब नवीन राहिलेली नाही. अशीच एक घटना घडल्याने त्याची चर्चा होत आहे..विशेष म्हणजे भर दिवसा ही घटना घडली आहे.खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैद्याने भर दिवसा तुरूंगातून पलायन केल्याचा प्रयत्न घडला. त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिताफीने अटक करण्यात आली आहे.खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) याने जळगाव कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. परंतू पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अवघ्या काही अंतरावर पकडण्यात यश आले. त्या बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रामानंदनगर परिसरात निवृत्ती काशिनाथ पवार हे कारागृहात शिपाई म्हणून नोकरीस आहेत. कारागृहात गेल्या दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात विजय सावकारे हा बंदी म्हणून कोठडीत आहेत. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ते संदीप अर्जुन थोरात, दिनेश दत्तू बारी, नागनाथ सुदाम येईल्वाड हे तिघे कर्मचारी कारागृहाच्या मेन गेटवर ड्युटीवर होते. सव्वासहा वाजेच्या सुमारास कारागृहाचा दरवाजा बाहेरुन कोणीतरी ठोठावला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले, परंतू त्यांना कोणीही दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा उघडून बघितला. याचवेळी कारागृहातील बंदी सावकारे याने पोलिसाला धक्का देवून तो कारागृहाच्या मेनगेटमधून पळून गेला.क्षणार्धात हा प्रकार घडल्याने पोलीस कर्मचार्‍यांनी आरडा-ओरडा करत पळालेला बंदी विजय सावकारे पाठलाग केला. याचवेळी कारागृहाकडे येत असलेले कारागृह शिपाई अनंत केंद्रकर आणि गणेश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यप्रवेद्वारावर त्याला पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा त्याची कारागृहात रवानगी केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या