Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeजळगाव‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही...असे म्हणत...

‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही…असे म्हणत तरुणीने केला तरुणावर धारदार शस्त्राने वार…!

पाचोरा/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही, असे म्हणत एका तरुणीनेच तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना पाचोरा येथील तलाठी कॉलनीत शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे.या तरुणीस अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एक नीलेश बोरसे (वय ३५) हे आपल्या परीवारासोबत रहायला आहे. यापूर्वी ही तरुणी व तरुण यांच्यात प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वीही लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबद्दल या तरुणीने नीलेशविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी रात्री ही तरुणी नीलेश याच्या घरी गेली आणि माझ्याशी लग्न कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी नीलेश हा बाहेर आला. ही संधी साधून तरुणीने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला. त्याच्या मान व हातावर जखमा झाल्या आहेत. त्याच्या बहिणीच्या फिर्यादीवरून त्या युवतीविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या