नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जागतिक महिला दिनानिमित्त कल्पना गणेश महिला मंडळातर्फे श्री इच्छापूर्ती हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित महिलांच्या हस्ते केक कापून करण्यात आली.यावेळी महिलांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.तसेच महिलांचे सक्षमीकरण कसे व्हावे, समाजातील त्यांची भूमिका अधिक बळकट कशी करता येईल याबाबतही मार्गदर्शनपर चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात लहान मुलींसह ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रांजली जैन, साक्षी जैन, रोशनी खुंटे, अंकिता वाणी, वैशाली कोष्टी, प्राची कोष्टी, सरला कासार, खुशी कासार, विद्या कस्तुरे, ज्योती तिडके, सुरेखा कस्तुरे, लीना वाणी, आश्विनी जैन, नीलिमा रत्नपारखे, लक्ष्मी खुंटे, अर्चना जैन, शारदा खारे, रत्नाआजी जैन, रत्नाआत्या खुंटे, इंदूआजी खुंटे व राधाआजी कासार यांच्यासह लहान मुला-मुलींचा सहभाग लाभला. तसेच कार्यक्रमासाठी कल्पना गणेश मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.

