नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रविण महाजन व जान्हवी रंधे यांच्या हस्ते करून माल्यार्पण करण्यात आले. यानंतर स्वरा अत्तरदे, दिया सुतार व भाग्यश्री भोई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. उपशिक्षिका नंदिनी सूर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सविस्तर माहिती देत प्रेरणादायी जीवनचरित्र मांडले. त्यानंतर नयना भंगाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन उपशिक्षिका नंदिनी सूर्यवंशी यांनी केले असून त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ओळख निर्माण झाली
नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
RELATED ARTICLES

