Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeजळगावसंस्कृती माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

संस्कृती माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- संस्कृती माध्यमिक विद्यालय येथे आज शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. येवले मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस श्री. ईश्वर पाटील सर यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी सौ. येवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्त्री शिक्षणाची सुरुवात, सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य व स्त्री शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी कशी केली, याविषयी माहिती दिली.कार्यक्रमात शिवदुर्ग महोत्सवात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या