Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeक्राईमनवरात्रात नारीशक्तीचे पूजन केले जात असताना पतीने केला पत्नीवर कोयत्याने वार; तीन...

नवरात्रात नारीशक्तीचे पूजन केले जात असताना पतीने केला पत्नीवर कोयत्याने वार; तीन बोटे तोडली; डोक्यावरही हल्ला.

अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे.स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. नवरात्री उत्सव साजरा करून नारीशक्तीचे पूजन केले जात आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी स्त्री ला मारहाण आणि खुनाच्या घटना घडल्या आहेत. आसूर होत पतीनेच पत्नीवर धारदार कोयत्याने डोक्यावर हल्ला केला. तिने डोक्यावरचा वार वाचवला खरा, पण हाताची तीन बोटेच छाटली गेल्याची घटना तालुक्यातील जानवे येथे घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.तर पत्नीवर वार करून हा असूररुपी पती लागलीच फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनीता प्रदीप भिल (वय ३० रा थाळनेर ता.शिरपूर) ही महिला आपल्या पतीसह जानवे येथे काही कामानिमित्त नातेवाईकांकडे आली होती. २१ रोजी सकाळी ती जानवे येथे पतीसोबत शेतात कामाला गेली. तेथे काही कारणावरून वाद झाला.एकमेकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नंतर शिवीगाळ ,मारहाण होत तिच्या डोक्यावर ‘धाऱ्या’ ने तीन वार केले.तसेच तिच्या हातावर वार करून डाव्या हाताचा अंगठाह तोडला. उजव्या हाताची दोन बोटे पूर्णतः तोडली. साधारणतः सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास शेतातून महिला घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली.

जखमी सुनीताला जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ मयुरी महाजन यांनी तिच्यावर प्रथमोपचार केले. मात्र सुनिताची प्रकृती गंभीर असल्याने तिला धुळे येथे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिच्या डोक्याला ३५ टाके पडले आहेत. सुनिताच्या डोक्यावर तिच्या पतीनेच वार केल्याचे समजते. घटनास्थळावरून तिचा पती फरार झाला आहे. सुनीता जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने सकाळी धुळे पोलीस तिचा जबाब घेणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेमुळे जानवे परिसरात याबद्दल चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या