Wednesday, June 24, 2026
police dakshta logo
Homeदेश-विदेशअमित शहा यांनी उत्कृष्ट प्रशासक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली: पंतप्रधान नरेंद्र...

अमित शहा यांनी उत्कृष्ट प्रशासक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली/विशेष वृत्त:-  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबात जन्मलेले अमित शाह आज त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी देशातील सर्व नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकही गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी सोशल मीडिया साईटवर सांगितले की, महत्त्वाच्या सहकार क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी अमित शहा देखील कौतुकास्पद काम करत आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, अमित शाह जी यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ आणि विकास करण्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे. उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाजपला मजबूत करण्यात गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे योगदान आहे. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो असे मोदी यांनी संबोधले.

पंतप्रधान मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या