जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ साठी विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावरील निदेशक पदांची भरती करण्यात येणार आहे. संबंधित व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेत लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी केले आहे.उमेदवारांनी अर्जासह शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे तसेच साक्षांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. उपस्थित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता देण्यात येणार नसल्याचेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या भरती प्रक्रियेत यंत्रकारागीर (१), TDM (J&F) (३), TDM (D&M) (१), यंत्रकारागीर घर्षक (२), कातारी (१), ट्रॅक्टर मेकॅनिक (१), गणित चित्रकला निदेशक (७), एम्प्लॉयबिलिटी स्किल्स निदेशक (६), संधाता (१), विजतंत्री (१), फॉन्डीमॅन (१), यांत्रिक डिझेल (२), पी.पी.ओ. (१) आणि जोडारी (१) अशा विविध पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत संस्थेत उपस्थित राहून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.