Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeनशिराबाददुर्गा उत्सव निमित्त नशिराबादमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न.

दुर्गा उत्सव निमित्त नशिराबादमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- काल दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी नशिराबाद शहर व परिसरातील दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली सामायिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच पत्रकार यांची उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दुर्गा उत्सव काळात शांतता राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सव काळातही डीजे वाद्य वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले. तसेच दुर्गा मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एक ते दोन पदाधिकारी उपस्थित राहून मूर्तीची विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश शासन परिपत्रकानुसार देण्यात आले.

यावेळी उपस्थित गणेश मंडळ अध्यक्ष व शांतता समिती सदस्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नशिराबाद नगरपरिषद अधीक्षक तोष्णीवाल व एमएसईबीचे कार्यकारी अभियंता पवन वाघुळदे यांनी आवश्यक ते आश्वासन दिले. या वेळेस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शहराध्यक्ष गणेश चव्हाण, शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष विकास धनगर, विनोद रंधे, बरकत अली, जनार्दन माळी, प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन, भूषण कोल्हे यांच्यासह परिसरातील पोलीस पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बैठकी दरम्यान, गणराया अवार्ड २०२५ जाहीर..

या बैठकी दरम्यान, गणराया अवार्ड २०२५ जाहीर करण्यात आले. यात प्रथम क्रमांक : श्री हनुमान पेठ मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक : श्रीराम मित्र मंडळ, तृतीय क्रमांक : द्वारका मित्र मंडळ तर, सार्वजनिक मित्र मंडळ, नेवगाव यांना “एक गाव एक गणपती” या संकल्पनेसाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. ही बैठक सायंकाळी ५:२० वाजता सुरू होऊन सायं ६ वाजता संपन्न झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या