Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजळगावात "नमो युवा रन "मध्ये युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगावात “नमो युवा रन “मध्ये युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भाजयुमो जळगाव तर्फे आयोजित ‘नमो युवा रन’ मध्ये मोठ्या संख्येने युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. नशा मुक्त भारत- स्वस्थ भारत या संदेशाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले! कार्यक्रम जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहर आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), आ. मंगेश चव्हाण जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ, प्रदेश सचिव भावेश कोठावदे, महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्यासह भाजप मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

‘नमो युवा रन’ चे संयोजक रोहित सोनवणे तर सहसंयोजक हितेश राजपूत, आकाश मोरे, उन्मेष चौधरी, लकी चौधरी, रियाज शेख, सतनामसिंग बावरी, गजानन वंजारी, अश्विन सैंदाणे, कल्पेश सोनवणे, दिनेश पुरोहित, जितेंद्र चौथे, सुनील (बंटी) भारंबे, बंटी बारी, हर्षल सिखवाल, निलेश बाविस्कर, उज्वल पाटील, संकेत शिंदे, श्याम पाटील, स्वप्नील चौधरी, विक्की चौधरी, विक्की सोनार, पंकज गांगडे, विपुल बराटे, हर्षल चौधरी सगळ्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम भव्यदिव्य केला. जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक व ऍथलेटिक्स असोशियन सचिव राजेश जाधव, प्रो. इकबाल मिर्जा यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या