Wednesday, February 11, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जैन स्पोर्ट्स, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीचा दबदबा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जैन स्पोर्ट्स, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीचा दबदबा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तर जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या प्रायोजकत्वाखाली जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप – २०२५ स्पर्धेचे आयोजन नुकतेच जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले. दि. १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातील १८४ खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही स्पर्धा ज्येष्ठ खेळाडू अविनाश दामले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील गटातील मुला-मुलींप्रमाणेच ३५+ गटातील पुरुष व महिलांच्या गटातील सामने खेळविण्यात आले.

जळगाव जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणारे खेळाडू हेमराज लवांगे व ओवी पाटील यांचा जळगाव बॅडमिंटन असोसिएशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. विजेते व उपविजेते खेळाडूंना जैन इरिगेशन सिस्टीमच्या वतीने आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयशा खान, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे, प्रशिक्षिका दीपिका ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच जाजिब शेख, पुनम ठाकूर, मशरूक शेख, फाल्गुन पाटील, श्वेता धामके, तेजल भालेराव, शुभम चांदसरकर, कोनिका पाटील, ओवी पाटील, श्लोक जगताप यांनी पंच म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रशिक्षक किशोर सिंह यांनी केले.

विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या