Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळ: पुनम विजय फालक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

भुसावळ: पुनम विजय फालक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ. पुनम विजय फालक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्रभैया पाटील, पाचोरा बाजार समितीचे संचालक शालीग्राम मानकर, संस्थाअध्यक्षा संदीपा वाघ, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा चव्हाण व समाजकार्यकर्त्या मनिषा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गेल्या तेरा वर्षांपासून त्या ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये अध्यापन करीत असून शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांनी उज्ज्वल केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. यापूर्वीही पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार बहाल करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच त्या सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. आयुर्वेद प्रसार, धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग, तसेच जैन साध्वींकडून कुटुंबासह मांसाहार त्यागाची प्रतिज्ञा घेऊन जिवदयेचा संदेश देणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्ये आहेत. शिक्षक दिनी त्यांचे विद्यार्थी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतात, ही त्यांची खरी शैक्षणिक कामगिरी असल्याचे मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून संसाररूपी जीवनप्रवास त्यांनी यशस्वीपणे पार पाडला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेच्या प्रमुख सौ. संदीपा वाघ व ज्ञानेश्वर वाघ यांनी त्यांना गौरविताना अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

पुरस्कार प्रदान सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल ताप्ती पब्लिक स्कूलचे चेअरमन महेश फालक, अध्यक्ष मोहनभाऊ फालक, सेक्रेटरी विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा, मुख्याध्यापिका निना कटलर, उपमुख्याध्यापिका मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन कांचन नेमाडे, जगन्नाथ नेमाडे, जयलक्ष्मी अॅकॅडमीचे जय व लावण्या फालक, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या