Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाव“वॉक फॉर युनिटी” उपक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश ; जळगाव जिल्हा पोलीस दलाचं...

“वॉक फॉर युनिटी” उपक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश ; जळगाव जिल्हा पोलीस दलाचं प्रेरणादायी आयोजन.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ‘वॉक फॉर युनिटी’ या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. शहर वाहतूक शाखा, जळगाव येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता या ५ कि.मी. वॉकचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रातील ऐक्य, अखंडता आणि बंधुतेचा संदेश सर्वत्र पोहोचविणे तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि सहकार्याची भावना दृढ करणे हा होता.

या वॉक फॉर युनिटी कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक, तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे हे विशेष उपस्थित होते. रॅलीची सुरुवात शहर वाहतूक शाखा, जळगाव येथून करण्यात आली. या वेळी मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे आणि मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकची सुरुवात केली. रॅलीचा मार्ग स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट मार्गे पोलीस कवायत मैदान असा होता. वॉकदरम्यान ‘एकता, शांतता आणि देशभक्तीचा संदेश’ देणारे घोषवाक्यांनी वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाची सांगता पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आली. या प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या एकात्मतेच्या विचारांचे स्मरण करून सर्वांना राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, मानव संसाधन विभाग, राखीव पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत सुगरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगीता नारखेडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. चिवंडे, तसेच सर्व कवायत निर्देशक व वेल्फेअर अंमलदार यांनी महत्वपूर्ण परिश्रम घेतले.

राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि सामाजिक ऐक्याची जाणीव अधिक दृढ झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या