Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद: आजपासून अखंड हरिनाम-ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताहास प्रारंभ

नशिराबाद: आजपासून अखंड हरिनाम-ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताहास प्रारंभ

नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिन्यातील अखंड हरिनाम-ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताहास आजपासून (दि. २९ ऑक्टोबर २०२५) भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या सप्ताहाचे आयोजन समस्त माळी पंच मंडळ, नशिराबाद यांच्या वतीने अध्यक्ष ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.संत महंतांच्या कृपाशिर्वादाने साजरा होणाऱ्या या सप्ताहामध्ये दिवसभर हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनाच्या माधुर्याने परिसर भक्तिमय होणार आहे.

दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा :-
पहाटे ५ ते ६: काकड आरती, सकाळी ७ ते ७.३०: श्री विष्णुसहस्रनाम पठण व पसायदान, सकाळी ७.३० ते ११: श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६: हरिपाठ, रात्री ८ ते १०: कीर्तन सोहळा.

कीर्तनकारांचा क्रम:-
२९ ऑक्टोबर: किशोर महाराज (कासोदा), ३० ऑक्टोबर: सुनील महाराज (विखरण), ३१ ऑक्टोबर: सारंगधर महाराज (अमळनेर), १ नोव्हेंबर: कन्हैया महाराज (शेंदुर्णी), २ नोव्हेंबर: परमेश्वर महाराज (पाळधी), ३ नोव्हेंबर: नाना महाराज (धरणगाव), ४ नोव्हेंबर: सुनील शास्त्री महाराज (नशिराबाद), ५ नोव्हेंबर: सदाशिव महाराज (साकरी) यांच्या वाणीतून काल्याच्या कीर्तनाचा विशेष सोहळा संपन्न होणार आहे.

भव्य दिंडी आणि महाप्रसाद..
सप्ताहाच्या सांगतेनिमित्त दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता भव्य दिंडी सोहळा काढण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.या कीर्तन सप्ताहासाठी नशिराबाद नगरीतून विविध मान्यवर, भक्तगण आणि संतमहंतांची उपस्थिती लाभणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या