Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात १७१ पदांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा

जळगाव जिल्ह्यात १७१ पदांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा

ऑनलाईन अर्ज २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान स्वीकारले जाणार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील १७१ रिक्त पदे भरण्यासाठी २०२४–२०२५ या वर्षासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आस्थापनेवरील १७१ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. २९ ऑक्टोबर २०२५ ते दि. ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज सादर करण्याची सुविधा:- http://policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, यासंबंधीची सविस्तर माहिती http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांची भरती केली जाणार असून, पात्रता, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा तसेच आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणी संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर पाहाव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून, उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक अटी व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी प्रसिद्ध निवेदनाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या