Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावनाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किरण नांद्रे यांची निवड

नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किरण नांद्रे यांची निवड

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नशिराबाद येथील समाजसेवक किरण नांद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील पद्मावती मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष किशोर सुर्यवंशी अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला राज्य अध्यक्षा भारती सोनवणे, जिल्हा अध्यक्ष सचिन सोनवणे, जिल्हा प्रमुख किशोर वाघ तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नशिराबाद येथील संत सेना नाभिक पंच मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले किरण नांद्रे यांनी अनेक वर्षे नाभिक समाजासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील ऐक्य, शिक्षण व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने समाज बांधणीसाठी योगदान दिले आहे. कार्यक्रमादरम्यान जिल्हा अध्यक्ष किशोर वाघ यांच्या हस्ते किरण नांद्रे यांना जिल्हा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील नाभिक समाजाचे प्रश्न समजून घेत, संघटन बळकटीसाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या किरण नांद्रे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या