Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमकंपनी कामगार तरुणाचा खून प्रकरण ; अवघ्या २४ तासांत पती-पत्नी आरोपी जेरबंद..!एमआयडीसी...

कंपनी कामगार तरुणाचा खून प्रकरण ; अवघ्या २४ तासांत पती-पत्नी आरोपी जेरबंद..!एमआयडीसी गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एमआयडीसी परिसरात झालेल्या वादातून कंपनी कामगार तरुणाचा अवैध अग्निशस्त्राचा वापर करून खून करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पती-पत्नी राहुल रामचंद्र ब-हाटे आणि मोनाली राहुल ब-हाटे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने फक्त २४ तासांत जेरबंद केले आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा झाल्यानंतर आरोपी पती-पत्नी यांनी स्थाने वारंवार बदलत पोलीसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपी नांदुरा (जि. बुलढाणा) येथे मोटारसायकलने जात असल्याचे समजले. त्यानंतर पथकाने पाठलाग करत दोन्ही आरोपींना महामार्गावर शिताफीने ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली. दि. 04/11/2025 रोजी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 07 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहेत.

या कारवाईत डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक, नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस स्टेशन चे अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकातील पो.उ.नि. राहुल तायडे, पो.उ.नि. चंद्रकांत धनके, सफो. विजयसिंग पाटील, पोह. प्रदीप चौधरी, पोह. गणेश शिरसाळे, पोह. प्रमोद लाडवंजारी, पोह. किरण चौधरी, पोह. गिरीश पाटील, पोका. नितीन ठाकुर, पोकों. गणेश ठाकरे, पोकों. किरण पाटील आणि पोका. शशिकांत मराठे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या