Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव महापालिका निवडणूक : १९ प्रभागांतील आरक्षण सोडत जाहीर

जळगाव महापालिका निवडणूक : १९ प्रभागांतील आरक्षण सोडत जाहीर

महिला, मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमातींसाठी जागांचे वाटप : राजकीय समीकरणांत बदल निश्चित.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली. प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहामध्ये आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या वेळी अनेक संभाव्य उमेदवार, पक्षांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली.सोडत प्रक्रिया “ईश्वर चिठ्ठी” पद्धतीने करण्यात आली असून, संपूर्ण सोडत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आली. शहरातील १९ प्रभागांमधील एकूण ७५ जागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रत्येक प्रभागात चार जागा असून त्यांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित झाले आहे.

जाहीर झालेले प्रभाग क्रमांक आणि आरक्षित जागा पुढीलप्रमाणे..
प्रभाग क्रमांक – १ अ) अनुसूचित जाती महिला • ब) मागासवर्ग • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – २ अ) अनुसूचित जमाती • ब) मागासवर्ग महिला • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ३ अ) अनुसूचित जाती महिला • ब) अनुसूचित जमाती महिला • क) मागासवर्ग • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ४ अ) अनुसूचित जाती महिला • ब) मागासवर्ग • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ५ अ) मागासवर्ग • ब व क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ६ अ) मागासवर्ग महिला • ब) सर्वसाधारण महिला • क व ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ७ अ) मागासवर्ग महिला • ब) सर्वसाधारण महिला • क व ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ८ अ) मागासवर्ग • ब व क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ९ अ) मागासवर्ग महिला • ब) सर्वसाधारण महिला • क व ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १० अ) अनुसूचित जाती • ब) मागासवर्ग महिला • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – ११ अ) अनुसूचित जमाती महिला • ब) मागासवर्ग • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १२ अ) अनुसूचित जाती • ब) मागासवर्ग • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १३ अ) मागासवर्ग • ब व क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १४ अ) मागासवर्ग • ब व क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १५ अ) मागासवर्ग महिला • ब) सर्वसाधारण महिला • क व ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १६ अ) मागासवर्ग • ब व क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १७ अ) मागासवर्ग महिला • ब) सर्वसाधारण महिला • क व ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १८ अ) अनुसूचित जमाती • ब) मागासवर्ग महिला • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक – १९ अ) मागासवर्ग महिला • ब) मागासवर्ग • क) सर्वसाधारण महिला • ड) सर्वसाधारण.

राजकीय तापमान वाढले ; समीकरणांचा फेरबदल…
आरक्षण सोडत जाहीर होताच अनेक प्रभागांतील संभाव्य उमेदवारांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्टपणे जाणवत होता. काही प्रभागांमध्ये आरक्षण बदल झाल्याने अनेकांनी आतापर्यंत केलेल्या राजकीय तयारीवर पाणी फिरल्याचे चित्र दिसले. तर काहींना अचानक संधी उपलब्ध झाल्याने उत्सुकता वाढली आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, यंदाच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक पक्षांची अंतर्गत गणिते बदलण्याची शक्यता असून उमेदवारांना नव्या प्रभागातून लढण्याची वेळ येऊ शकते.स्थानिक स्तरावर पक्षांतर्गत चर्चा, उमेदवारांची मांडणी, संभाव्य बदल आणि बंडखोरीचे संकेतही दिसू लागले आहेत.

पारदर्शक प्रक्रिया ; प्रशासनाचे समाधान..
आरक्षण प्रक्रिया शांततेत आणि कोणताही वाद न होता पार पडल्याने उमेदवार व नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू…
सोडत जाहीर होताच निवडणूक प्रचाराची पहिली घंटा वाजली असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
आता चर्चेचा एकच विषय
कोणत्या प्रभागात कोण उतरते?
आरक्षणाचा लाभ कोणाला मिळणार?
पक्षांतर्गत हालचाली कशा होतील?

आगामी काही दिवसांत शहरातील राजकीय तापमान आणखी वाढणार, हे निश्चित.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या