Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहरात मध्यरात्री ‘स्पेशल ऑपरेशन’ स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव शहरात मध्यरात्री ‘स्पेशल ऑपरेशन’ स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जळगाव पोलिसांनी धडक मोहीम राबवली. मा. डॉ. महेश्वर रेडी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षकांनी दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० ते १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ००.३० वाजेपर्यंत जळगाव शहरात विशेष ऑपरेशन राबविले.या मोहिमेत जळगाव शहर, एमआयडीसी आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर तसेच शांतता भंग करण्याच्या तयारीत असलेल्या इसमांवर कारवाई करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत –
रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, कासमवाडी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा आदी भागांत छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ०७ इसमांवर वि.पी. अॅक्ट ११२/११७ अंतर्गत गुन्हे दाखल.

जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत –
कांचननगर, विठ्ठलपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गोपाळपूरा, कोळीपेट, मेस्कोमातानगर, गुरुनानक नगर, शनिपेठ गवळीवाडा, ज्ञानदेव नगर, दाळफळ, तळेले कॉलनी, शंकर अप्पा नगर येथे विशेष मोहिम.या मोहिमेत १४ इसमांवर मुंबई पोलीस अॅक्ट १२२ अंतर्गत, ०२ इसमांवर मोटार वाहन कायद्यानुसार, तर ०२ इसमांवर वि.पी. अॅक्ट ११२/११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत –
शिवाजी नगर, गेंदालाल मिल परिसर, राजमालतीनगर, शाहनगर येथे छापेमारी पार पडली.

एस. के. ऑईल मिलसमोर देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या इसमाकडून १४ बाटल्या (₹५६० मूल्य) जप्त करून मु.पो.का. कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल.

मिथीला अपार्टमेंटखालील विकास बियर शॉपमध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याच्या माहितीनंतर १६९ बाटल्या (₹१६,४६५ मूल्य) जप्त. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

तसंच कोटपा कारवाईत ०१ इसमानकडून ₹२०० दंड वसूल.

या कार्यवाहीत अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः पथकासोबत सहभाग नोंदवत, क्यूआरटी पथक, आरसीपी पथक व ताफ्यातील अंमलदार यांच्या सहकार्याने मोहीम राबविली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, आगामी निवडणुक काळात असे अचानक विशेष ऑपरेशन्स सुरू राहणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या