Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावरिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे अट्टल चोरटे जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची धडक...

रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे अट्टल चोरटे जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ब-हाणपुर (मध्यप्रदेश) येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २०२/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२) अन्वये रिक्षात प्रवाशी बसवून त्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने उलगडला असून, या गुन्ह्यातील दोन अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.

जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार १) वसीम कय्युम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव), २) तौसीफ सत्तार खान (वय ३६, रा. रामनगर, जळगाव) हे दोन्ही पुन्हा गुन्हे करणारे आरोपी असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला तत्काळ तपासाबाबत आदेश दिले.

गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी रिक्षात प्रवाशी बसवून खिसे कापी करीत चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त करण्यात आली असून, दोन्ही आरोपी व जप्त साहित्य पुढील कारवाईसाठी ब-हाणपुर (मध्यप्रदेश) कोतवाली पोलीस स्टेशन येथील पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, महेश सोमवंशी
यांनी सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या