Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहर उपविभागात कॉबिंग ऑपरेशन

जळगाव शहर उपविभागात कॉबिंग ऑपरेशन

३१० गुन्हेगारांची तपासणी ; १०४ जणांना ताब्यात, ९ जणांवर वॉरंटची बजावणी.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था मजबूत राखण्याच्या उद्देशाने, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांच्या आदेशानुसार जळगाव शहर उपविभागात गुरुवारी (१४ नोव्हेंबर) पहाटे विशेष कॉबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सकाळी ४ ते ८ दरम्यान चाललेल्या या मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगार, संशयित व विविध गस्त पथकांनी कसून तपासणी केली.

ऑपरेशनदरम्यान करण्यात आलेली ठळक कारवाई पुढीलप्रमाणे:-
३१० सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी :
उपविभागातील विविध परिसरात धाड टाकून ३१० गुन्हेगारांची घरी जाऊन पडताळणी करण्यात आली.
१०४ संशयितांची धरपकड :
तपासणीदरम्यान संशयास्पद वर्तन, पूर्व रेकॉर्ड आणि हालचालीच्या आधारे १०४ जणांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे चौकशी करण्यात आली.
९ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी :
न्यायालयाने जारी केलेल्या NBW प्रकरणातील ९ आरोपींना अटक करून वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
१ शस्त्र जप्त—Arms Act गुन्हा दाखल :
एका इसमाकडून विनापरवाना घातक शस्त्र आढळल्याने भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 अंतर्गत गुन्हा नोंद.
• वाळू चोरीचा १ गुन्हा :
अवैध वाळू उपसा व वाहतूकप्रकरणी एक गुन्हा दाखल.

ही संपूर्ण मोहिम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच शहर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि पोलीस मुख्यालयातील ४ RCP पथक यांनी ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या