Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावबंद घरातील घरफोडी करणारे दोन आरोपी MIDC पोलिसांच्या ताब्यात.

बंद घरातील घरफोडी करणारे दोन आरोपी MIDC पोलिसांच्या ताब्यात.

५२ हजारांचा मुद्देमाल जप्त ; अल्पवयीनाचा सहभाग

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लक्ष्मीनगर परिसरातील बंद घरात घरफोडी करून ऐवज चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जलदगतीने अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ५२०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका अल्पवयीनाचा सहभागही उघड झाला आहे.लक्ष्मीनगर येथे राहणारे फिर्यादी राजेंद्र दुसाने हे कुटुंबासह गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात होते. दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून मिळताच त्यांनी जळगाव गाठले. घराची पाहणी केली असता एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर, गॅस शेगडी, गॅस हंडी, तांबे-पितळी भांडी व इतर वस्तू चोरीस गेलेल्या दिसल्या. यावरून MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील पो.उ.नी. राहुल तायडे, पो.उ.नी. चंद्रकांत धनके यांच्यासह सफो व पोलीस कर्मचारी अशा एकूण १२ जणांचे पथक तयार करून आवश्यक सूचना दिल्या.पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत दि. १३ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनगर परिसरात सापळा रचून संदीप तुळशीराम शेवरे (रा. लक्ष्मीनगर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार राहुल सुपडू चौधरी व एका अल्पवयीन मुलासह चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण ५२०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर दि. १४ नोव्हेंबर रोजी दुसरा आरोपी राहुल सुपडू चौधरी हाही ताब्यात घेतला असून गुन्हा करताना वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या