Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशुल्लक वादातून लेकाकडून बापाचा खून ; दहा दिवस घरातच दफन..! प्रकरण उघड

शुल्लक वादातून लेकाकडून बापाचा खून ; दहा दिवस घरातच दफन..! प्रकरण उघड

पैठण-कडेठाण | तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब भावले | पोलीस दक्षता लाईव्ह:- किरकोळ कारणावरून लेकानेच बापाचा खून करून तब्बल दहा दिवस राहत्या घरातच दफन केल्याचा धक्कादायक प्रकार कडेठाण येथे उघडकीस आला. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे ही घटना शनिवारी दि.22 नोव्हेंबर रोजी उघड झाली.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, कल्याण बापुराव काळे (58) हे पत्नी सुमन आणि धाकटा मुलगा राम काळे (28) यांच्यासोबत घरी राहत होते. मोठा मुलगा ऊसतोड कामाला बाहेरगावी गेला होता. दहा दिवसांपूर्वी बाप-लेकात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात झालेल्या मारहाणीमुळे कल्याण काळे यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेचा कानोसा लागू नये म्हणून राम काळेने राहत्या घरातच गड्डा खोदून मृतदेह दफन केला. घरातील सुमन काळे या भोळसट असल्याने त्यांनी कोणालाही माहिती दिली नाही. मात्र मृतदेह पूर्णपणे कुजल्याने गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दुर्गंधी पसरू लागली. नागरिकांच्या संशयानंतर अखेर प्रकरण उघड झाले.याची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पीएसआय राम बारहाते व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. महसूल अधिकारी व फॉरेन्सिक पथकांच्या उपस्थितीत घरातील गड्डा उकरून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

चौकशीत आरोपी राम काळेने लाथा-बुक्क्यांच्या मारहाणीतून वादाच्या भरात वडिलांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या